College
Home | About Us | Achievement | Faculty | Staff | Photo Gallery | Contact Us
www.gnacollege.com www.gnacollege.com www.gnacollege.com www.gnacollege.com
 
Courses
Admissions
Facilities
Activities
Events
Sports
Award
Student Council
Alumni
Academic Calender
Download
 

 
 
 
 
GNA College , Barshitakli BACK   >>
 
गुलाम नबी आझाद महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय रसायनशास्त्र प्रश्नावली स्पर्धेचे आयोजन


बार्शिटाकळी-
विद्यापीठस्तरीय रसायनशास्त्र प्रश्नावली स्पर्धेचे दि.10 फेब्रुवारी 2020 रोजी रसायनशास्त्र विभाग व अमरावती विद्यापीठ रसायनशास्त्र शिक्षक संघटना (औक्टा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले, या स्पर्धेत विद्यापिठातील विविध महाविद्यालयातील बहुसंख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, पुजन व स्वागतांनी झाली. त्यानंतर रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. एस. इढोळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सर्व पाहुण्यांचा परिचय देऊन कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.मंचावर उपस्थित असलेले उदघाटक प्रा. डॉ. के. एन. पुरी, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ पी.पी.देवहाते, जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.थोरात मॅडम तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार उपस्थित होते.

अशाप्रकारचे विद्यापीठस्तरीय प्रश्नमंजुषाचे आयोजन ग्रामीण भागात घेणे महत्वाचे असुन आयोजनाच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रश्नावली व चर्चा समजायला सोपे जाईल असे डॉ.पुरी सरांनी सांगितले. प्रा. डॉ देवहाते सरांनी विविध उदाहरणे देऊन या स्पर्धेचे महत्त्व सांगितले, तर अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. मधुकर पवार सरांनी रसायनशास्त्र विभागाचे विशेष कौतुक करून अशा स्पर्धा भविषयामधेही राबवाव्या असे प्रतिपादन केले.उदघाटनानंतर स्पर्धेला लगेचच सुरुवात झाली, विविध फेऱ्यांमधून गुणानुक्रमे अंतिम चार संघांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम बक्षीस अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ, द्वितीय रा.शा. महाविद्यालय चांदुर रेल्वे,तृतीय ईंनानी महाविद्यालय कारंजा लाड तर प्रोत्सहानपर बक्षीस जि.एस. महाविद्यालय खामगाव यांनी पटकाविले.या स्पर्धा प्रश्नवलीसाठी प्रा. डॉ.एस.जी.बदने व प्रा. डॉ. पि. आर. कावळे यांनी विशेष निरीक्षक म्हणुन भूमिका बजावली. यासाठी आलेल्या सर्वच स्पर्धकांना आयोजकांच्या वतीने भोजन व प्रवास खर्चाची व्यवस्था करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रश्नावलीसाठी प्रा. ए. बी. पाटील, तांत्रिक कामासाठी प्रा. डॉ. एस. डब्लू. सुरडकर तर नोंदणी व प्रमाणपत्र यासाठी प्रा. डॉ. व्ही. एस. उंडाळ यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मसतकर मॅडम तर आभार प्रदर्शन रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एस. ए. वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता महाविद्यालयातील इतर प्राध्यापक डॉ. ए. बी. वैराळे, डॉ. एन. एम. कंकाळे, डॉ. ए. एस. श्रीराव, डॉ. पाटील व सर्व प्राध्यापक तसेच विध्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
readycureayurveda.com All Rights Reserved. 2012 - 2019 Gulam Nabi Azad College. readycureayurveda.com